Onion : कांदाप्रश्नी फडणवीसांचे सभागृहात आश्वासन, मात्र अद्यापही अंमलबजावणी नाही

नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेद सुरु करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, अद्यापही कांद्याची खरेदी सुरु झाली नाही.

Agriculture News Onion

1/10
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2/10
नाफेडच्या (Nafed) माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेद सुरु करण्याचा आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं होतं. मात्र, अद्यापही खरेदी केंद्र सुरु झाली नाही.
3/10
नाफेडकडून कांदा खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळं नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
4/10
फडणवीसांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली मात्र, अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.
5/10
सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे.
6/10
दर कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कांद्याला सध्या 300 ते 400 रुपयांचा दर मिळत आहे
7/10
विरोधी पक्षांनी कांदा दराच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं होतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं, नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु करावी, कांद्याला चांगला दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
8/10
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली होती
9/10
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2 हजार 200 ते 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 400 ते 500 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत.
10/10
राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करुन कांदा उत्पादकांना सहाय्य करावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने (All India Kisan Sabha) पत्र लिहून केली आहे.
Sponsored Links by Taboola