कलिंगड लागवडीतून मिळवा लाखोंचा नफा
महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली आहे. रब्बी हंगामात कलिंगड पिकाच्या लागवडीतून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरब्बी हंगामात कलिंगड पिकाची लागवड फायदेशीर ठरते. या काळात कलिंगड पिकाला चांगला दर असतो. त्यामुळं शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो.
कलिंगडाच्या लागवडीतूनही शेतकरी चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतात. गेल्या काही वर्षापासून कलिंगड शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.
शेतकरी हंगामी पिकांच्या उत्पादनातूनही लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात. यातीलच एक पीक म्हणजे कलिंगड आहे. अत्यंत मर्यादित क्षेत्रात हंगामानुसार कलिंगड पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
महाराष्ट्रात 660 हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड लागवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कलिंगड मर्यादीत क्षेत्रावरच लागवड करण्यात आली आहे. मर्यादित क्षेत्र असले तरी यातून शेतकरी चांगला नफा मिळवत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
साधारणत: डिसेंबर महिन्यात कलिंगड पिकांच्या लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यात केलेली लागवड मार्च महिन्यात पिकाची काढणी केली जाते.
काही भागात फेब्रुवारीच्या मध्यात कलिंगड पिकाची लागवड केली जाते, तर डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते.
कलिंगडाच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, कलिंगड पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. टरबूज पिकाला 24°C ते 27°C दरम्यानचे तापमान गरजेचे आहे.
कलिंगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर पाणी असते. याशिवाय चुना, फॉस्फरस तसेच अ, ब, क यासारखी जीवनसत्त्वे असतात.