Agriculture : अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका, केळीच्या बागा जमिनदोस्त
राज्यातील विविध भागाला अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोडपून काढलं आहे. तसेच अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसामुळं शेतात उभी असलेली पिकं आडवी झाली आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात वादळी झालेल्या अवकाळी पावसानं केळीच्या बागा (Banana Crop) जमीनदोस्त झाल्या आहेत.
बागा काढणीला आल्या होत्या. मात्र या अवकाळी पावसामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
दुसरीकडं यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
हिंगोली जिल्ह्याल जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. काल झालेल्या झालेल्या पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
केळी काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झाला आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
राज्यातील, बुलढणा, यवतमाळ, हिंगोली, जालना, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, परभणी या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.