Turmeric : हिंगोलीत बाजार समितीत हळदीची आवक वाढली
मराठवाड्यासह विदर्भातील हळद हिंगोलीत बाजार समितीत दाखल झाली आहे. 16 हजार कट्ट्यांची आवक हिंगोली समितीत दाखल झाली आहे.
Agriculture News Turmeric
1/9
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
2/9
हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16 हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली आहे.
3/9
दरवर्षी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmers) हळदीची विक्री करण्यासाठी हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असतात.
4/9
यावर्षी देखील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळदीची आवक वाढली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अमरावती, यवतमाळ ,अकोला, वाशिम, जळगाव या भागातील हळद मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे.
5/9
पुढील पाच दिवस हळद विक्री बंद राहणार आहे. बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमुळं हळद विक्री बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीसाठी गर्दी केली होती.
6/9
हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्यालगत वाशीम जिल्हा असल्यानं या जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात
7/9
image 7
8/9
राज्यात सांगलीनंतर (sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये केली जाते.
9/9
मे अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेनं हळदीचा हंगाम सुरु राहणार असल्याची माहिती व्यापारी वर्गानं दिली आहे.
Published at : 25 Apr 2023 02:21 PM (IST)