Bhandara : भंडारा जिल्ह्यातील नेरला उपसा सिंचन योजना पूर्ण
तब्बल 40 वर्षांपासून निर्माण कार्य सुरु असलेला भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण (Gosekhurd Dam) लवकरच पूर्ण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोसीखुर्द धरणाची संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना (Nerla Upsa Irrigation Scheme) जवळपास पूर्ण झाली आहे.
अधिकाऱ्यांनी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडलंय. यामुळं पंचक्रोशीतील शेतकरी आनंदी आहेत.
सुखावणारी बाब म्हणजे, सोडलेलं पाणी 50 किमी लांब असलेल्या अंतिम गावापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चार दशकानंतर दारी पोहोचलेल्या पाण्यामुळं सुखावले आहेत.
मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे. या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्याला फायदा होणार
नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला होता
ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली आहे. ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जल सिंचन योजना आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती.
प्रकल्प पूर्ण झाल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.