Gram crop : हरभरा उत्पादक शेतकरी समाधानी, पोषक वातावरणामुळं उत्पादनात वाढ
यावर्षी उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या हरभरा पिकासाठी (Gram Crop) वातावरणही पोषक आहे. त्यामुळं एकरी हरभऱ्याचे पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न येत आहे. तर विविध वाणानुसार हरभऱ्याला सात हजार ते 12 हजार रुपयापर्यंतचा बाजार भाव मिळत आसल्यानं शेतकरी (Farmers) समाधानी आहेत.
बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्यानंतरही दर कायम राहावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रब्बी हंगामात एकट्या नंदूरबार जिल्ह्यात 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे.
यावर्षी हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळं हरभऱ्याचे एकरी पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता.
हरभऱ्याचे एकरी पाच ते सात क्विंटल असे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. एकरी सात हजार रुपयापर्यंतचा खर्च हरभरा पिकासाठी आहे. उत्पादन चांगलं असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
हरभऱ्याला प्रतवारीनुसार 7 हजार रुपयापासून ते 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे
आता रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. यामुळं शेतकऱ्यांना हरभऱ्याचा विक्रम उतारा मिळत आहे.
रब्बी हंगामात एकरी हरभरा पिकाच्या क्षेत्रात खर्च वजा जाता तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पादन मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचे विक्रमी उत्पादन येत असले तरी बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानंतर हरभरा पिकाच्या किमती मध्ये घट येऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.