Hingoli News: लोप पावत चाललेल्या सूर्यफुलाच्या लागवडीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे सूर्यफूल
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता लोप पावत चाललेल्या सुर्यफुलाच्या लागवडीला पसंती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएरवी रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, या पिकांची लागवड करतात.
परंतु, या पिकांच्या लागवडीला बगल देत जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे
हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सुर्यफुलाचे लागवड केली आहे.
सूर्यफूलाचे पीक घेण्यासाठी पेरणीनंतर जास्त काळजी घेण्याची गरज नसते.
इतर पिकांसारखे कोणतीही जास्त फवारणी किंवा खते देण्याची आवश्यकता नसल्याचे कमी खर्चात उत्पादन जास्त उत्पादन मिळते
शिवाय सूर्यफूल हे पीक तेल बिया मध्ये येत असल्याने मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते
सध्या सूर्यफूल 6 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सूर्यफुलाला बाजारात भाव मिळत आहे.
शेतकरी बागल यांना दीड एकर शेतात 15 क्विंटल उत्पादन मिळणार आहे.
त्यामुळे खर्च वगळता या सूर्य फुलाच्या पिकातून शेतकरी बागल यांना 50 हजार रुपये निव्वळ नफा मिळणार आहे