Flower : पालघर जिल्ह्यात फुलांचं गाव, गातेस गावाला नवी ओळख
शेतकरी (Farmers) सातत्यानं शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामाध्यमातून चांगला नफाही मिळवत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग पालघर (Palghar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाडा तालुक्यातील 'गातेस' (Gates) या गावानं फुलशेतीतून (Flower Farming) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वाडा तालुक्यातील गातेस गावानं फुलशेतीतून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 ते 60 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुलशेती आणि आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड करत जिल्ह्यात एक शेतीत नवीन आदर्श निर्माण केला आहे
वाडा शहराच्या दक्षिणेस असलेलं हे गातेस गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षांपासून वाडा, कोलम या वाणाची भात शेती केली जात होती
हवामान बदलाचा परिणाम आणि उत्पादन खर्च वाढल्यानं येथील शेतकऱ्यांनी अखेर फुल शेतीचा निर्णय घेतला.
गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुल शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. या फुल उत्पादकांनी डिसेंबरच्या सुरुवातीपासून फुल शेतीची लागवड केली असून सध्या या गावात फुलशेती पासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.
मागील दहा वर्षांपासून या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या फुलशेतीमुळं येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडीही मजबूत होऊ लागली आहे.
गावात सध्या लाल आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची लागवड होत असून, या फुलशेतीत आंतरपीक म्हणून टोमॅटो, भोपळा, कोबी या भाजीपाल्यांची पीक घेण्याची सुरुवात केली आहे.
सध्या या गावातून आठवड्यातून दोनदा जवळपास दहा हजार किलोच्या घरात फुलाची विक्री होत आहे. यातून अडीच लाख रुपयांच्या घरात आठवड्यातून दोनदा उलाढाल होते.