Garlic Farming: लसूण खात्रीशीर नफा देतोय,नगरच्या विष्णू जरेंना गेल्या 25 वर्षापासून दीड एकरातून होतोय लाखोंचा फायदा, कसं नियोजन करायचं? वाचा

भाजीतला लसूण हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरामध्ये वापरला जातो.सध्या लसणाचे भाव खूप वाढले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यामुळे शेतकऱ्याकडे असलेला लसुन त्यांना चांगले पैसे मिळवून देत आहे.

अहिल्यानगर शहराशेजारी असलेल्या जेऊर गावातील विष्णू जरे हे शेतकरी मागील 25 वर्षापासून लसूण शेती करतात.
त्यांच्याकडे असलेल्या 9 एकर शेती पैकी एक ते दीड एकर वर ते दरवर्षी लसुन लावतात या लसूण पिकापासून त्यांना दरवर्षी लाखोंचा नफा मिळतो चार महिन्याचं असलेलं लसूण पीक खात्रीशीर नफा देणार आहे.
चार महिन्यातच चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळत असल्याने जरे केवळ लसूण शेतीवरच भर देतात.
विष्णू जरे यांनी मागील 25 वर्षात पारंपारिक लसूण ते विद्यापीठाने विकसित केलेले वेगवेगळे लसूण पिकं घेतली आहेत लसूण पिकात त्यांचा मोठा अनुभव आहे.
आपल्याकडे असलेल्या शेतीतील काही भागात लसूण लागवड करून यशस्वीरित्या उत्पादन घेण्यासाठी शेतीचा प्रकार, मशागत, पाण्याचे डोस आणि निविष्ठा यांचे योग्य प्रकारचे नियोजन करावं लागतं असं विष्णू जरे सांगतात.