Dam Water Storage Maharashtra: तीव्र उष्णतेच्या लाटा, तापमानवाढीचे संकेत, मार्चच्या सुरुवातीला राज्यातील धरणसाठा कुठवर? वाचा जलसंपदा विभागानं काय सांगितलंय..

राज्यात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड रखरख वाढलीय .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,मार्च ते मे दरम्यान देशभरात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि तापमान वाढीचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असून राज्यातील एकूण 6 विभागातील धरणसाठ्यात आज (2 मार्च) 58.20% पाणीसाठा शिल्लक असल्याचं जलसंपदा विभागाने सांगितलं .
पुणे विभागात 58.98% उपयुक्त पाण्यासाठी राहिलाय .तर नाशिक विभागात 58.77% पाणीसाठा शिल्लक आहे .
मराठवाड्यात लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण 55.45% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
असून जायकवाडीत 70 % पाणीसाठा आहे .
कोकण व मुंबई भागातील धरणांमध्ये 62.47% पाणीसाठा असल्याचं जलसंपदा विभागाने नोंदवले .
नागपूर व अमरावती भागात 52.90% व 61.69% पाणीसाठा शिल्लक आहे .