Photo : गुळाच्या उत्पादनातून लाखोंची उलाढाल, आष्टी गावातील शेतकऱ्यांना लाखोंचा नफा
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील आष्टी (Ashti) या गावात देखील गुळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकराच्या रासायनिक द्रव्याचा वापर न करता आष्टीमध्ये गुळाचं उत्पादन घेतलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआष्टीच्या गुळाचा गोडवा देशभरात प्रसिद्ध आहे. या माध्यमातून शेतकरी (Farmers) लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील आष्टी हे गाव. सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या या गावात पारंपरिक पद्धतीचा वापर करून गुळाचे उत्पादन घेतलं जातं
या गावात सुमारे 70 गुळाच्या घाणे आहेत. येथील ग्रामस्थ त्यातून अवघ्या तीन महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल करतात.
आष्टीच्या गुळाला देशभरात मोठी मागणी आहे. कारण हा गुळ कोणत्या रासायनिक द्रव्याचा वापर न करता तयार केला जातो.
तुमसर तालुका हा जंगलव्याप्त असून आष्टी हे गाव मध्य प्रदेश सीमेच्याजवळ आहे. गावाला लागून जंगल असून एका बाजूने बावणथडी नदी प्रवाहित आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे.
गावातच ऊसाचे उत्पादन होत असल्यानं मागील अनेक दशकांपासून गावात गुळ निर्मितीचे घाणे (पारंपरिक छोटे अंगमेहनतीचे कारखाने) आहेत. सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या आष्टी गावात 70 पेक्षा अधिक घाणे आहेत.
डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात येथील ग्रामस्थ गावातच गुळाची निर्मिती करतात. अगदी शुद्ग आणि कुठल्याही प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा वापर न करता इथे गुळाची निर्मिती करण्यात येते.
. या कामासाठी प्रत्येकाकडे किमान 20 ते 25 महिला आणि पुरुष कामगार काम करतात. या माध्यमातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
तीन महिने गुळाचे उत्पादन घेवून लाखोंची उलाढाल होते. सोबतच कामगारांच्या हाताला काम मिळत असून, हाताने निर्मिती केलेल्या चविष्ट गुळाला मोठी मागणी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी आष्टी गावात येतात