Photo : बदलत्या हवामानाचा 'ज्वारी'ला फटका
बदलत्या हवामानाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. ज्वारी पिकावर देखील परिणाम झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीतील चढ उतारामुळं पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड येथील खर्डा (Kharda) परिसरात हवामान बदलाचा ज्वारीच्या पिकाला (jowar Crop) मोठा फटका बसला आहे.
ज्वारीच्या पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.
यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हवामान बदलामुळं ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीचं पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
दरवर्षी हजारो क्विंटल ज्वारीचं उत्पादन देणाऱ्या खर्डा परिसरातील शेतकरी आता हवालदिल झाला आहे.
एकीकडे बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकावर परिणाम होत असतानाच दुसरीकडे खर्डा परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. डुकरांनी ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे.
जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.
यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हवामान बदलामुळं ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
अनेक ठिकणी ज्वारीचं पीक खाली पडलं आहे. याचा परिणाम कडब्यावर होणार आहे. त्यामुळं यावर्षी ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे