Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : कापसाच्या दरात घसरण, निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज
सध्या कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकापसाच्या दरात घसरण झाल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापासाच्या दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.
दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कापूस (Cotton) घरात साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाच्या दरात वाढ कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कापसाच्या दरात वाढ होण्यासाठी निर्यातीत (Export) सातत्य ठेवणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या हंगामात 11 ते 12 हजार रुपये क्विंटलच्या दरानं विक्री होणारा कापूस यंदा मात्र, 7 ते 8 हजार रुपय दरानं विक्री केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्योगांना महाग वाटत असल्यानं त्यांना कमी दरात कापूस हवा असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
देशात सरकीचे दर 3 हजार 600 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापसाला 8 हजार 200 ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
गेल्या पंधरवड्यात सरकीचा दर प्रतिक्विंटल 3 हजार 400 रुपयांपर्यंत खाली आल्यानं कापसाचे दर कमी झाले होते. शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रतिक्विंटलची अपेक्षा आहे.
कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. तर जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी कापशीला मिळालेल्या बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती. पण अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.