Photo : कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत

cotton

1/10
सध्या कापसाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
2/10
सध्या कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कापसाला 10 हजार रुपयांच्या पुढे दर मिळावा अशी मागणी केली आहे.
3/10
धुळे जिल्ह्यात कापसाचे मोठे क्षेत्र आहे. तेथील शेतकऱ्यांना सध्या कापसाला कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
4/10
शेतकऱ्यांनी कापसाला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
5/10
ओला कापूस असल्याच्या कारणामुळे भाव गडगडले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाने उभारी घेतली आहे. मात्र राज्यात कापसाला अपेक्षीत दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
6/10
कापसाच्या दरात सुधारणा झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, अचानक भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
7/10
कापसाला किमान दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
8/10
कापसाचा हंगाम नवरात्रीपासून सुरू झाला होता. 12 हजार 51 रुपये उच्चांकी भाव देऊन कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र महिनाभरातच कापसाचे दर घसरले.
9/10
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी कापसाला सात ते आठ हजार पाचशे रुपयांचा वर्षातील नीचांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
10/10
शेजारील मध्य प्रदेश राज्यातील खेतिया बाजारात कापूस नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री झाला. त्यामुळं महाराष्ट्रात देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
Sponsored Links by Taboola