Rain : राज्यात अवकाळीचा कहर, शेती पिकांना फटका
image 1राज्यातील मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) जोर वाढला आहे. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान (Agriculture Crop loss) होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसामुळं बळीराजा पुरता हैराण झाला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात फटका हा भाजीपालावर्णीय पिकांना बसत आहे.
अवकाळी पावसाचा फटका कारले, वांगे, टोमॅटो, मिरची यासारख्या पिकांना या पावसाचा फटका बसत आहे.
अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत.
राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
अवकाळी पावसामुळं नांदेड जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार घातला आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुताशं भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली.