papaya : पपई उत्पादक अडचणीत, पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला
Continues below advertisement
Agriculture News Nandurbar
Continues below advertisement
1/10
पपईला (papaya) सध्या बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
2/10
राज्यातील शेतकरी (Farmers) सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहे.
3/10
रोगांच्या प्रादुर्भावामुळं पपईची पाने गळून फळे उघडे पडण्याची भीती असते. त्यामुळं फळ खराब होण्याचे प्रमाण वाढते. पपईवर आलेल्या या रोगामुळं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
4/10
देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदूरबार जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी पपईला चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.
5/10
नंदूरबार जिल्ह्यात यावर्षी पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. पपईला दरही चांगला मिळत आहे. 11 रुपये प्रति किलोने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरून पपई खरेदी करत आहेत.
Continues below advertisement
6/10
शेतकऱ्यांचा आर्थिक गणिते गतिमान होण्यासाठी हे दर चांगले असले तरी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. मागील आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
7/10
विषाणूजन्य रोगांमुळं पपईची पाने पिवळे पळून पान गळती होते. तर दुसरीकडे पपईच्या झाडाचा शेंडा अकसून जातो. त्यामुळं पपई फळावर थेट सूर्यकिरण पडून फळ खराब होण्याची भीती जास्त असते.
8/10
नंदूरबार जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. मात्र पपई पिकावर रस शोषणा करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
9/10
अल्टेनिया नावाचा विषाणूजन्य आजारामुळं पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू झाल्यानं खडे उघडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
10/10
ऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठांनी पपई संशोधन केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Published at : 04 Feb 2023 09:48 AM (IST)