Tomato Price: टोमॅटोला फक्त 80 पैसे भाव! संतप्त शेतकऱ्यांचे लातूर भाजी मंडईत आंदोलन
मात्र मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकरी हा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी घेरलेला आहे.
टोमॅटोच्या पिकासाठी औषधाचा वाढणारा खर्च आणि लागणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.
सध्या लातूर बाजार समितीत टोमॅटोला अवघा 80 पैसे भाव मिळतोय.
महिन्याभरापूर्वी 25 ते 30 किलोच्या कॅरेटला 25 ते 150 रुपये पर्यंतचा भाव मिळाला आहे.
निचांकी भाव मिळत असल्याने विकण्यापेक्षा तो फेकून देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झालीय.
सर्वत्र बंपर पीक निघाल्याने टोमॅटोला मागणी कमी आणि आवक जास्त झाली आहे.
लागवड, मजुरी, वाहन खर्च निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकला आहे
शेतकऱ्यांना त्यांनी खर्च केलेले पैसे परत मिळत नाहीयेत. शेतात केलेली मेहनत वेगळीत, त्याचं मोलच नाही.