अवकाळी पावसाचा तडाखा, भंडारा आणि अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावलीय. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील भंडारा (bhandara) आणि अकोला (akola) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालंय.
पपईसह केळीच्या बागा (Damage to papaya and banana) भुईसपाट झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे.
अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत.
अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.
अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसलाय
शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत.
संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.