onion : रोहित पवार बांधावर, 'त्या' कांदा उत्पादक शेतकऱ्याची घेतली भेट
नाशिकमधील (Nashik) नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली आहेत. या शेतकऱ्याची कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी भेट घेऊन चर्चा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील कसमादे परिसरात सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतलं जातं.
रोहित पवारांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळं नाशिकमधील (Nashik) नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली आहेत.
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी ( Onion Farmers) चिंतेत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
मागील 8 वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं उत्पादकांना खर्च वजा करुन नफा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकरी आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत.
कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होतं. इथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो