Nandurbar : नंदूरबारमध्ये पपईच्या दरात घसरण, नवे दर लागू
वातावरणात होणाऱ्या बदलामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) पपईच्या काढणीला वेग दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
देशातील सर्वात मोठा प्रकल्प उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून पपईचे दर ठरत असतात.
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून पपईचे दर ठरत असतात. शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे दर निश्चित करण्यात आले आहेत
पपईच्या दरात प्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत. नंदुरबारमध्ये (Nandurbar) व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून, पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील, अशी माहिती बाजार समितीच्या वतीनं देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वरती गेले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे.
सध्या शेतकरी पपईची वेगवान काढणी करत आहेत. त्यामुळ बाजारपेठेत पपईची आवक वाढली आहे. वाढत्या आवकेमुळं आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागणी कमी झाल्यानं दरात घसरण.
व्यापारी आणि शेतकरी यांच्या झालेल्या बैठकीत दर एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.
नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरातच्या सीमावरती भागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते.