Agriculture News : नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ
शासनाच्या हमीभावापेक्षा बाजार समितीत जास्त दर मिळत असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाफेडच्या हरभरा (Gram) खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे.
शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांची नोंदणी
हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी नेत आहेत.
हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा
मेक्सिकन वाणाला 10 हजारांचा तर गावरानी स्थानिक वाणाला 5 हजार रुपयापर्यंतचा दर
दरवर्षी नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू केली जाते.
शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिले
नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ