Agriculture : पुरंदरच्या शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल उत्पादन घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.
गोपाळ कदम (Gopal Kadam) यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
गोपाळ कदम हे 1986 साली पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील त्यांनी घेतलं आहे.
शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. गोपाळ कदम यांनी शेती करताना सरकारी योजनांचा लाभ घेतला.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम हे घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करतात.
गोपाळ कदम यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.