Photo : शेतकऱ्यांसाठी अमेरिकेचा रोबो माण तालुक्यात
माणदेशी फाऊंडेशन (Mann Deshi Foundation) शेतकरी, महिला उद्योजक यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ बनत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांना (Farmers) जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी माण देशी फाऊंडेशन नवीन पाऊल उचललं आहे. माण (Mann) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतील रोबो आणला आहे.
रोबोच्या माध्यमातून पिकाची पाहणी करुन, रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकांला आवश्यक असणाऱ्या खतांच्या मात्रा याची माहिती मिळणार आहे.
म्हसवडजवळ या रोबोचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांनी दिली.
या रोबोचा माणसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी येथील माण देशी फाउंडेशन पुढाकार घेतला आहे. या रोबोचे म्हसवडजवळच्या ढोकमोढा येथील शेतात डाळिंब, मका, ज्वारी आदी पिकांच्या पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
डाळिंब, मका, ज्वारी आणि बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनवले आहे. अमेरिकेतील रोबोच्या माध्यामातून शेतकऱ्यांना पिकावर झालेल्या रोगाची माहिती मिळणार आहे.
मूळच्या पुण्यातील रहिवासी असलेल्या चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे या दोघांनी सलग चार वर्षे अमेरिकेत संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांची पाहणी करुन पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे समजते.
पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे या दोघांनी संशोधन करुन हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित कॅमेरे असून, कॅमेऱ्यांच्या साह्याने पिकाचे चित्रण करून पिकाची उंची, रंग, जाडी याच्यासह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे समजते.
माहितीचे अचूकरीत्या विश्लेषण करून हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. या रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.