रब्बी पिकं धोक्यात, पाण्याच्या कमतरतेमुळं बळीराजा चिंतेत
राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी रब्बी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता पिकांची उगवण झाली असताना विहीर, बोअरलने तळ गाठला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत.
प्रकल्पातून पाणी मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळं पिके कशी जोपासली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.लातूर जिल्ह्यातील दोन लाख 50 हजार हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत.
पाण्याअभावी पिकं मान टाकत आहेत. शासन दरबारी रब्बी पेरणीच्या टक्केवारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे.
पिकं वाया जाण्याच्या मार्गावर असल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
जमिनीतील ओल उडून जाईल, या भीतीने खरीप पिकांची काढणी होताच मशागत न करता शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली होती. जिल्ह्यात सरासरीच्या 80 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे.
पाण्याअभावी उगवण होताच पिकांनी माना टाकल्या आहेत. हंगामी नाही किमान अवकाळी पाऊस तरी तारेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र प्रतिकूल वातावरणामुळे रबीची आशा धुसर झाली आहे.
यावर्षी पावसानं प्रमाण कमी आहे. बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळं विहीर आणि बोर यांनी देखील तळ गाठला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प आहे. यामुळं प्रशासनानं या ठिकाणी पाण्याच्या मोटरी लावण्यासाठी बंदी घातली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.