Agriculture : श्रावण शेतकऱ्याला पावला; झेंडू फुलातून लाखोंची कमाई
साधारणता झेंडूचे उत्पादन हे दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलं जातं. या काळात झेंडूला मोठी मागणी असते. वाहन, दुकाने आणि विविध उद्योग प्रतिष्ठाने झेंडूच्या फुलांनी सजविली जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष्मीपूजनात या फुलांना मोठी मागणी असते. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्याने मात्र श्रावण महिन्यातील पूजा-पाठ लक्ष्यात घेऊन झेंडूची लागवड केलीय. या शेतकऱ्याचा प्रयोगही यशस्वी झाला असून त्यातून शेतकऱ्याची लाखो रुपयांची कमाई होणारेय..
सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झालीय. या महिन्यात विविध फुलांना मोठी मागणी असते. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका फुल शेती साठी म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यात सर्वच प्रकारच्या फुलांची शेती केली जाते.
याच मुदखेड तालुक्यातील मुक्ताई वाडी या गावातील विजय इंगोले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील १३ गुंठे जमिनीत झेंडूची लागवड केलीय. सध्या त्यांची ही बाग झेंडूच्या फुलांनी बहरलीय.
या झेंडूच्या लागवडीसाठी इंगोले यांना केवळ १३ हजार रुपये खर्च आलाय. नांदेडच्या फुल मार्केटमध्ये ही झेंडूची फुले विक्री साठी जातायेत.
सध्या या फुलांना चांगला भाव मिळतोय. १३ गुंठे जमीन, १३ हजार रुपये खर्च, खर्च वजा करता दोन महिन्यात विजय इंगोले यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.
साधारणपणे पावसाळ्यात झेंडू येत नसतो. पण यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे झेंडू फुलांना पोषक वातावरण मिळाले. आणि शेतकऱ्याने केलेली हिंमत कामी आली. परिश्रमासोबतच एकंदरीतच मार्केटचा अभ्यास करून शेतीत प्रयोग केले तर यशस्वी होऊ शकतात हे या शेतकऱ्याने दाखवून दिलंय.