Marathwada : राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील खरीपाची पीकं धोक्यात
सध्या राज्यात सर्वत्र पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात (Marathwada) पावसाने दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे.
पुढील आठ दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांना पाण्याची गरज आहे.
सध्या पाऊस पडत नसल्यानं पीकं धोक्यात आली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.
गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झालं राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेली पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे.
जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला. ज्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे
दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनची आकडेवारीत मोठा फरक जाणवला आहे. यापूढे पावसाची काही प्रमाणात शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.