Turmeric : हिंगोलीत हळदीला मिळाला विक्रमी दर, शेतकरी आनंदी
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत (Vasmat Bazar Samiti) हळदीला आत्तापर्यंतचा विक्रमी दर मिळाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमत बाजार समितीत क्विंटलला 30 हजार रुपयांदा दर मिळाल्यानं बळीराजा समाधानी झाला आहे.
देशातलाच आत्तापर्यंतचा हा सर्वोच्च विक्रमी दर मिळाल्याचे बोलले जात आहे.
हळदीला मिळालेल्या या विक्रमी दरामुळ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हळदीचे हब म्हणून हिंगोली जिल्ह्याला ओळखलं जातं. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते.
वसमतच्या बाजार समितीत हळदीला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. बाजार समितीत हळदीला तब्बल 30 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांनी त्यांच्याकडील अकरा पोती हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती. तेव्हा या हळदीला तब्बल 30000 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.
राज्यात सांगलीनंतर (Sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात होते.
हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो.
हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.