यशोगाथा! गुलाबाच्या फुलातून महिन्याला 1 लाखाची कमाई
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील बाबासाहेब गोजरे या शेतकऱ्यांने करत लाखोंची कमाई सुरु केली आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारून गोजरे यांनी गुलाब फुलांची शेती (Rose Farming) केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामध्ये त्यांनां यश आले असुन, आज घडीला महिन्याकाठी ते गुलाबांच्या फुलांतून सव्वा लाखांची कमाई करत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
पैठण तालुक्यातील वडजी शिवारातील बाबासाहेब गोजरे यांनी एक एकर क्षेत्रात गुलाब व निशींगंधा फुलांची बाग फुलवली. ज्यात त्यांनी एकूण दोन हजार रोपं पुण्यावरून आणली.
गोजरे यांनी जवळपास 700 रोपं हे ‘ग्लॅडिएटर’ जातीचे असून, रइतर डिवाईडर (शिर्डी गुलाब) म्हणुन ओळख असणाऱ्या गुलाबाची रोपं आहे.
या फुलाच्या बागेला जगवण्यासाठी त्यांनी संपूर्ण रोपट्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे. याद्वारेच पाणी, खत फवारणीची व्यवस्था केली आहे.
मागील तीन वर्षांपासून गोजरे यांना दर महिन्याला जवळपास 1 लाख ते सव्वा लाख रुपये गुलाब फुलांच्या विक्रीतून मिळत आहे. ज्यात संध्या लाखो रुपय निव्वळ नफा शिल्लक राहतो, असे गोजरे यांनी म्हटले आहे.
गुलाबाच्या बागेला नऊ महिने सतत फुल येतात. मात्र, या झाडांपासून ऑगस्ट ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सातत्याने चांगले फुल येतात.
मार्चमध्ये उन्हाच्या झळांमुळे फुलांवर वाईट परिणाम होतो. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी ही आठ महिने सतत फुल तोडणी करावी लागते.
फुलांची तोडणी करण्यासाठी एक मजूर किंवा स्वत: तसेच कुटुंबातील सदस्य मदत करतात.
पंधराशे फुलझाडांपासून दर दिवसाआड किमान दोन हजार गुलाब फुल तोडली जाते.
फुलांची विक्री करण्यासाठी औरंगाबाद शहरातील बाजारात पाठवण्यात येते. तर दोन रुपये फुलांप्रमाणे त्यांना बाजारात भाव मिळतोय.