Ranbhaji : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले

कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या.

Palghar Ranbhaji

1/9
पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी फुलले आहेत .
2/9
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
3/9
आदिवासी समाजातील नागरिक जंगलातून रानभाज्या गोळा करुन रस्त्यावर ठिकठिकाणी विक्री करतात.
4/9
यामध्ये कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर आदींचा समावेश आहे.
5/9
लोत, कंटोली, शिराळा, काकडी, तेरा, शेवळी, शिण, पेंढरु अशा शंभरपेक्षाही जास्त भाज्या पालघरमधील जंगलांमध्ये उपलब्ध आहेत.
6/9
कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या.
7/9
बाजारात या रानभाज्यांची किंमत इतर पालेभाज्यांपेक्षा जास्त असली तरी शरीरासाठी या भाज्या पौष्टिक असल्याने मोठी मागणी या रानभाज्यांना आहे.
8/9
भिवंडी वाडा मार्गावर तसेच विक्रमगड जव्हार मार्गावर मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विक्री केली जात आहे.
9/9
या भाज्यांचं दुसरं महत्त्व म्हणजे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना या रानभाज्यांमुळे पावसाळ्यात 2 ते 3 महिने रोजगार मिळतो .
Sponsored Links by Taboola