Onion : महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर
महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर, हमीभाव कायद्यामुळं शेतकऱ्यांना फायदा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली आहे.
महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे माजी आदीवासी मंत्री नागेश गोडाम ( Nagesh Godam) यांनी दिली.
तेलंगणा येथे महाराष्ट्रातील कांद्याला दुप्पट भाव दिला जात आहे.
जो कांदा भाव नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ महाराष्ट्रात आली, त्या कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे.
तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळं हा भाव देऊ शकले असेही नागेश गोडाम म्हणाले. गोडाम हे वर्धा इथं आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कारंजा घाडगे येथे भारत राष्ट्र समितीकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
तेलंगणा सरकारमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी हमीभाव तर आहेच याशिवाय एक विशेष निधी देखील आहे.
कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला गेल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.