सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचं उत्पन्न
युवा शेतकऱ्यानं सव्वा एकर पपईच्या शेतीतून 23 लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. प्रतिक पुजारी असे सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यातील कुंडलच्या युवा शेतकऱ्याने कमाल केली आहे. वयाच्या 25 वर्षी सव्वा एकर पपईच्या बागेतून 23 लाखांच उत्पन्न घेतलं आहे.
योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रतिक पुजारी या शेतकऱ्याने पपईतून भरघोस नफा मिळवला आहे. या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुंडलच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा. योग्य नियोजनातून पपई शेतीतून कमावलं भरघोस उत्पन्न
प्रतिक पुजारी हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे शेतकरी. त्यांनी त्यांच्या सव्वा एकरवर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. या सव्वा एकरमध्ये जवळपास 1 हजार 100 पपईची झाडे लावली आहेत.
पपईची बाग लावून त्यांना दोन वर्ष झाली. या पपईचे गेल्या 18 महिन्यापासून उत्पादन सुरुच आहे.
आत्तापर्यंत 210 टन पपईचे उत्पादन निघाल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. या उत्पादनातून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतिक पुजारी यांनी सांगितले.
आत्तापर्यंत सव्वा एकर पपईच्या शेतीतून 210 टन उत्पादन मिळालं आहे. आणखी 30 टन उत्पादन निघण्याची शक्यता असल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.