Agriculture : पाणी नसल्यानं फळबागांची होरपळ

जुलै महिन्याचा पंधरवाडा संपत आला तरी अद्याप राज्यात म्हणावा तसा पाऊस (Rain) झाला नाही. काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसानं ओढ दिल्यानं दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. तर काही भागात फळबागांची होरपळ सुरू झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे
अहमदनगर जिल्ह्यामध्ये यंदा केवळ 95 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे.
बागायत भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र दक्षिण नगर जिल्ह्यातील जिरायत पट्ट्यामध्ये पाऊस नसल्यामुळं अद्यापही अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसानं ओढ दिल्यानं दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.