Onion : नाफेडकडून बाजार समितीत कांद्यांची खरेदी सुरु नाहीच
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क (onion export duty) आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारनं राज्यात दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय
नाफेडकडून (Nafed) बाजार समितीत कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्यापही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून कांद्यांची खरेदी सुरु झाली नाही.
नाफेडने बाजार समितीत अद्याप कांद्याची खरेदी केली नाही यामुळं पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नाफेडनं वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याची चर्चा सुरु आहे.
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातमूल्य 40 टक्के निर्यात शुल्क आकारले आहे. याविरोधात राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन करत ' रान ' उठवले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल असा भाव देत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि नाफेडचे अधिकारी अशा संयुक्त बैठका घेत नाफेडने बाजार समितीतून कांदा खरेदी करावी असे आदेश दिले आहेत. मात्र, आठ दिवस उलटूनही आजतागायत नाफेडने बाजार समितीतून एक क्विंटलही कांदा खरेदी केला नाही
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे
नाफेडकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही बाजार समितीत कांदा खरेदी सुरु झाली नाही.