क्षणार्धात होत्याचं नव्हतं, वाऱ्यामुळं दोन एकर द्राक्ष बाग कोसळली
सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंगमध्ये जोरदार वाऱ्यामुळं दोन एकर द्राक्ष बाग (Grapes Crop) कोसळली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांचे 15 लाख रुपयांच्या आसपास नुकसान झालं आहे. महादेव रंगराव जगताप ( Mahadeo Jagtap) असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.
सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्यानं बागेच्या आत शिरकाव केला आणि बघता बघता बाग खाली कोसळली.
ही द्राक्ष काही दिवसातच निर्यात करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच बाग कोसळल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी गावातील महादेव रंगराव जगताप यांची खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती. पुढच्या आठ ते दहा दिवसात द्राक्ष बाग सुरू होणार होती.
अतिशय परिश्रम घेवून जगताप यांनी यावर्षी बाग चांगली जोपासली होती. सकाळी साडेसात वाडण्याच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला. बघता बघता एका झपाट्यात बाग खाली कोसळली.
बाग कोसळल्यानं शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागला. यामध्ये शेतकऱ्याचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाग कोसळल्यानं शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागला. यामध्ये शेतकऱ्याचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सलग दोन वर्षे त्यांना द्राक्ष उत्पादन कमी आले होते. पण यावर्षी त्यांनी बागेकडे चांगले लक्ष दिलं होतं. बागेला मालही बरा होता. अत्यंत गरिबीतून कष्ट करुन त्यांनी कर्ज काढून त्या बागेला सांभाळले होते.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी गावातील महादेव रंगराव जगताप यांची खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती.