Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, पाहा फोटो
मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड (Beed) जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात दाखल होताच, परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी आदी गोगलगायींनी प्रभावित झालेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी कृषीमंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी आणि उपाययोजनांबाबतही माहिती घेतली.
मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केल्यावर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचे अहवाल आपल्याला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे, यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत उद्या सायंकाळपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देखील कृषीमंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश मंत्री मुंडे यांनी दिलेत.
तर, धनंजय मुंडे यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि शेतकरी हे बांधावर आल्याचे पाहायला मिळाले.
तसेच. कमी पावसाने सध्या पेरण्यांचे प्रमाण कमी आहे, तसेच पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकटही येऊ शकते, मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.