Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?
![Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती? Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/6f1c7f1d3d702efd51b4c94b6822729def047.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाकी या गावचा नदीच्या पुलाच्या पाईपमध्ये कचरा व गाळ अडकल्यामुळे संपर्क काही काळ तुटला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती? Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/d4af6b0e3d894fd8ef14848e73c8002435f74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
हा कचरा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी साहाय्याने काढून रस्ता सुरळीतपणे चालू करण्यात आला.
![Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती? Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/f0dda4bc5de0a6a98234f18f5822c37d971b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
धर्माबाद तालुक्यातील बनाळी या पूरग्रस्त गावाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरिकांच्या अडचणी समजून लोकांना धीर दिला.
हदगाव तालुक्यातील मौजे नेवरी येथील 21 घरांमध्ये पाणी जाऊन अन्नधान्याचे नुकसान झाले. संबंधित कुटुंबातील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
हदगाव-उमरखेड मधील पैनगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी सुरू असून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. पुराचे पाणी ओसरत आहे.
दरम्यान यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष हजर राहून पाहणी केली.
तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीमुळे फुटला. पाण्याचा विसर्ग हा संथ गतीने राहिल्यामुळे पाणी एकदम बाहेर निघाले नाही. यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले