Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा फटका, 310 हेक्टरवरील शेतीचं नुकसान
राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं भंडारा जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावासामुळं अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं आडवी झाली आहेत.
अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात अवकाळी पावसामुळं 310 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातील 702 घरांची पडझड झाली आहे. त्यामुळं सरकारनं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
1 ते 3 मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट आणि मुसळधार पावसानं जिल्ह्यात 702 घरांची पडझड झाली आहे.
लाखनी तालुक्यात 310 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका लाखनी तालुक्याला बसला असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.