onion : कांदा उत्पादक संकटात, राज्यमंत्री भारती पवारांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारती पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मागणीनंतर मंत्री पियूष योगल यांनी कांदा खरेदीचं आश्वासन दिलंआहे.
सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाली. याचा मोठा आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो.
मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले.
सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.
नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. त्यामुळं त्यांच्या या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीय.
अवकाळी पावसामुळं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.