Agriculture : खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री
भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात गहू आणि पीठाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरानं FCI च्या माध्यमातून गव्हाची विक्री सुरु केली आहे.
गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं (Govt) 25 जानेवारीला 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही विक्री करण्यात आली.
केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळं देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती आता थोड्या कमी झाल्या आहेत.
केंद्र सरकार गव्हाच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, देशाच्या विविध भागांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर, राखीव किंमती कमी केल्या जात आहेत.
भारतीय अन्न महामंडळाने, 23 राज्यांमध्ये 620 ठिकाणी झालेल्या तिसर्या ई-लिलावात 5.07 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली आहे. यामध्ये 1 हजार 269 व्यापाऱ्यांना गव्हाची खरेदी केली आहे.
गव्हाची ई-लिलावतून होणारी ही खुली विक्री 15 मार्चपर्यंत दर बुधवारी, केली जाणार आहे. ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी गहू बाजारात उपलब्ध करुन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.
एक आणि दोन फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या लिलावात, 9.13 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली होती
देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती.
30 लाख मेट्रीक टनाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.