wheat : गव्हासह पिठाच्या किंमतीत मोठी वाढ
देशात गव्हाच्या (Wheat) किंमतीबरोबर पिठाच्या (Flour) किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागात गव्हाची किंमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.
केंद्र सरकारनं (Government) खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. देशात गव्हाचे दर अनेक दिवसांपासून वाढले आहेत
गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. जेणेकरुन सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये.
गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे.
भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) बाजारात गहू उतरवण्याची जबाबदारी आहे. ई-लिलाव म्हणजेच ई-लिलावाद्वारे खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गहू बाजारात आणला जाणार आहे.
गव्हाचा साठा आटा मिलर्स आणि देशातील मोठ्या घाऊक खरेदीदारांना टेंडरद्वारे विकला जाईल.
बाजारात गव्हाचा खप वाढला तर मागणी तेवढी राहणार नाही, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गहू आणि पिठाच्या दरात घसरण होऊ शकते.