Wheat : 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री होणार, सरकारची मंजुरी
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत 30 लाख मेट्रीक टन (LMT)गहू विक्रीचा ( wheat sale) प्रस्ताव केंद्र सरकारकडून (Central Govt) मंजूर करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय अन्न महामंडळ (FCI) खुल्या बाजार विक्री योजने (देशांतर्गत) अंतर्गत विविध मार्गांद्वारे मध्यवर्ती साठ्यातून 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात आणणार आहे.
देशांतर्गत गहू आणि पिठाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यापारी, राज्य सरकारे आणि सहकारी संस्था, महासंघ, सार्वजनिक क्षेत्र या उपक्रमाद्वारे गव्हाची विक्री केली जाणार आहे
खुल्या बाजार विक्री (देशांतर्गत) योजनेद्वारे 30 लाख मेट्रीक टन गहू दोन महिन्यांच्या कालावधीत विक्रीसाठी बाजारात आणण्यात येणार आहे.
गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तत्काळ परिणाम होईल. वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यास मदत होईल तसेच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बुधुवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत देशातील बफर स्टॉकच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढत्या किंमतीवर त्वरित नियंत्रणासाठी, गहू बाजारात उतरवण्याच्या पर्यायांना मंत्र्यांच्या समितीने (CoM) मान्यता दिली आहे.
ई-लिलाव अंतर्गत भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रातून प्रती लिलावासाठी जास्तीत जास्त 3000 मेट्रिक टन गव्हाचा प्रति खरेदीदाराकडून ई-लिलावाद्वारे पिठाच्या गिरणी मालकांना, घाऊक खरेदीदार इत्यादींना पुरवठा केला जाईल.