एक्स्प्लोर

Nagpur ZP : जिल्हा परिषद नेमणार 50 कंत्राटी शिक्षक; भरती रखडल्याने सेस फंडातून 28 लाखाची तरतूद

सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 2005 पासून भरती बंद असल्याने नागपूर जिल्ह्यात सुमारे 700 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

नागपूरः जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली. या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.

अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

राज्यात 40 हजार पदे रिक्त

राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे. या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
Horoscope Today 29 October 2026 : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 5 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 5 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ramayana Sai Pallavi Comment On Ravana: 'रावण पूर्णपणे वाईट नव्हताच...'; साई पल्लवीचं जाहीर वक्तव्य, नेटकरी विचारतायत, 'अगं किडनॅपरचं कौतुक कसं करू शकतेस?'
'रावण पूर्णपणे वाईट नव्हताच...'; साई पल्लवीचं जाहीर वक्तव्य, नेटकरी विचारतायत, 'अगं किडनॅपरचं कौतुक कसं करू शकतेस?'

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
Embed widget