Nikhil Kamath : गुंतवणुकीबाबत (Investment) झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamath) यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य करताना निखिल कामत यांनी म्हटलं आहे की, गुंतवणूकदारांनी वाईट काळामध्ये जास्त न गमवण्यावर आणि चांगल्या काळामध्ये जास्त न कमवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, 'जर बाजाराचा दर हा कमी पातळीवर असेल तर त्यामध्ये वाहून जाऊ नका.'
'मी वयाच्या 19 वर्षांपासून काम करत असल्याने एक गोष्ट मला नक्की शिकवली आहे की, वाईट काळामध्ये जास्त गुंतवणूक करुन आपले पैसे वाया घालवू नये. त्याचप्रमाणे चांगल्या काळात देखील अधिक गुंतवणूक करुन जास्त पैसे न कमावणेच फायद्याचे ठरु शकते', असं कामत यांनी म्हटलं आहे.
कामत यांनी निफ्टी निर्देशांकाची ऐतिहासिक कामगिरी दर्शवणारा अहवाल देखील सादर केला आहे. निफ्टीच्या गेल्या दोन दशकातील बुल अँड बेअर मार्केटचा तक्ता त्यांनी दाखवला आहे. तर त्यांनी यावर बोलताना म्हटलं आहे की, 2020 मध्ये सुरु झालेल्या बुल मार्केटचा निर्देशांक तीन वर्षे आणि तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 160 टक्क्यांनी वाढला आहे.
निफ्टीमधील चढउतार
निखिल कामत यांनी निफ्टीमधील चढउतारांची माहिती दिली आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, 2005-06 मध्ये निफ्टी हा 170 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर 2006 मध्ये एका महिन्यात 30 टक्क्यांनी घसरला होता. पण अलीकडे ही सरासरी ओलांडताना पाहायला मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. निखिल कामत यांनी दिलेल्या या सल्ल्यांमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीने जुलैमध्ये नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. यामध्ये सेन्सेक्सने 67,619.17 अंकासह नवी झेप घेतली आहे. तर निफ्टीने 20 जुलै 2023 रोजी 19,991.85 या नव्या उच्चांकाची नोंद केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची स्थिती पुन्हा एकदा वधारली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
जर तुम्ही ITR शी संबंधित 'हे' काम केलं नसेल तर टॅक्स रिफंड विसरा; एक रुपयाही परत मिळणार नाही