Nitin Desai Suicide: कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई (ND Studio) यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत सभागृहात चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, 'नितीन देसाई यांच्यावर दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सरकार करेल.'
आशिष शेलार यांनी सभागृहातील सांगितलं , 'नितीन देसाई यांनी 186 कोटी रुपये कर्ज काढले होते. 186 कोटीचे 252 कोटी कर्ज झाले. एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. त्याची कर्ज देणारी कंपनी आहे. आधुनिक सावकारी आहे. व्याजावर व्यज लावण्याचा प्रकार आहे. चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येला न्याय द्या.'
अशोक चव्हाण म्हणाले, 'ज्यांनी कर्तुत्वाने आपलं काम उभ केलं. त्यांनी चांगला स्टुडिओ उभारला. त्यांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. त्यांच्यावर कर्ज होतं आणि त्यांच्या मागे माणसे लागली होती त्यामुळं त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असं म्हटलं जात आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. तो स्टुडिओ शासनाने आपल्याकडे घ्यावा.'
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' नितीन देसाई यांनी काल आत्महत्या केली आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं होतं. अनेक राजकीय पक्षाचे काम देखील ते करत होते. दिल्लीतील चित्ररथ देखील तेच करत होते. पंतप्रधान यांनी वाराणसीला जे घाट केले त्यामध्ये देखील देसाई यांनी काम होतं .त्यांच्यावर कर्ज झालं होतं. स्टुडिओवर कर्ज होतं. त्यांचा स्टुडिओवर कब्जा करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले गेले आहेत का? त्यांच्यावर काही दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी जोर जबरदस्ती केली गेली का? नियामाच्या बाहेर जाऊ त्यांच्यावर इंट्रेस लाऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सरकार करेल. एका मराठी माणसानं तयार केलेला स्टुडिओ तो आहे. त्या स्टुडिओच्या कायदेशीर बाबी तपासून हा स्टुडिओ सरकारला टेक ओव्हर करता येईल का? याबाबत प्रयत्न केला जाईल.'
2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: