Yavatmal Latest News Update : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार रुग्णालयात होत असलेल्या हल्ल्यच्या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षचा प्रश्न निर्माण झाला असून आता शिकाऊ डॉक्टर चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिकाऊ डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग पत्करला.  शिकाऊ डाक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. मागील वर्षभरात हल्ल्याच्या तीन घटना झाल्या आहेत. यामध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा मृत्यूही झाला होता. 


यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास 24 नंबर वार्डत  भरती असलेल्या सुरज ठाकूर या रुग्णाने कर्तव्यावर असलेल्या सॅबिस्टीयन पॉल आणि अभिषेख झा या निवासी डॉक्टरांवर प्राणघातक चाकू हल्ला केला. या घटनेत सॅबिस्टीयन पॉल याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. चार ते पाच टाके पडले आहेत. तर डॉ अभिषेक झा किरकोळ जखमी झाला. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर डॉक्टरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली त्यानंतर  संतप्त डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या पूर्वीसुद्धा महाविद्यालयात परिसरात डॉ. अशोक पाल यांच्यावर 10 नोव्हेंबर 2021 ला हल्ला करून हत्या करण्यात आली. तर 6 डिसेंबर 2022ला  सशस्त्र आठ ते दहा जनांच्या टोळक्याने ओपीडीमध्ये हल्ला केला होता. यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा अधिक कडक करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


वॉर्ड नंबर 24 मध्ये डॉ सॅबिस्टीयन पॉल आणि अभिषेख झा हे रुग्णांची तपासणी करीत होते. त्याचदरम्यान सूरज ठाकूर या रुगणने या दोघांवर अचानक चाकूने हल्ला केला. त्यामुळे वॉर्डात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दोघांना वाचवण्यासाठी महिला सहकारी डॉक्टरांनी आरडाओरडा केला. सुरक्षा राक्षकांनाही बोलविण्यचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी कुठलाही सुरक्षा रक्षक नव्हते. त्यामुळे जखमी डॉक्टरला उपचारासाठी दाखल करण्यासाठी वेळ लागला. शिकाऊ डॉक्टर यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन उभारले आहे. यावेळी रुग्णालयातील परिसरातून घोषणाबाजी करत गेटवर येत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर शिकाऊ डॉक्टर ठाम आहेत. 


काल रात्री डॉक्टर डॉक्टर स्टेपिस्टिंग फॉल याच्यावर झालेल्या जीवनात आल्यानंतर प्रशिक्षणाचे डॉक्टर निवासी डॉक्टर चांगलेच संतप्त झाले. या डॉक्टरांनी आता आंदोलनाचा हत्यार उपासना असून त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे कोणालाही आज किंवा बाहेर जाता येत नाही, या डॉक्टरांच्या एकूण 13 मागण्या आहेत. त्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन अशाच प्रकारे सुरू ठेवण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिलेला आहे. 


रुग्णालयातील डॉक्टरावरील हल्ला प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर आता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या घटनेतील आरोपी ठाकूर याला अटक करण्यात आली. शिवाय महाविद्यालय प्रशासनाकडून पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना किंवा त्या ठिकाणी पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितलं. हल्ल्याच्या घटनेनंतर डॉक्टरांनी जे आंदोलन पुकारलं त्यामुळे गाव खेड्यातून उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता प्रशासन नेमकी या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.  


आणखी वाचा :
Yavatmal Doctor Strike: धक्कादायक! यवतमाळमध्ये रुग्णाचा दोन डॉक्टरांवर चाकूने प्राणघातक हल्ला; निवासी डॉक्टरांचे कामबंद