World Literacy Day 2022 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (World Literacy Day 2022) दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात 1966 सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवसानिमित्ताने जगभर शिक्षणाविषयी जनजागृती केली जाते. 


साक्षरता म्हणजे काय? (What Is Literacy Meaning) :


साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. भारतात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू-वाचू-बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजतात. थोडक्यात साक्षरतेसाठी देशात अक्षर ओळख असण्याला महत्त्व आहे. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. 


कधीपासून साजरा होत आहे साक्षरता दिवस?


आंतरराष्ट्रीय पातळीवर 1966 पासून साक्षरता दिवस साजरा होत आहे. याआधी 1965 मध्ये 8 ते 19 सप्टेंबर दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे जगभरातील देशांच्या शिक्षणमंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जात आहे. 


काय आहे साक्षरता दिवसाची संकल्पना? (World Literacy Day Theme 2022) :


साक्षरता दिवसाचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. दरवर्षी साक्षरता दिवसानिमित्त थीम असते. त्याुसार यावर्षीची थीम 'ट्रांसफॉर्मिंग लिटरेसी लर्निंग स्पेस' (Transforming Literacy Learning Spaces) अशी आहे.


महत्वाच्या बातम्या :