World Immunization Week 2022 : जागतिक लसीकरण सप्ताह (World Immunization Week) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जगभरात साजरा केला जातो. यावर्षी 24 ते 26 एप्रिल दरम्यान हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोकांना लसीकरणाचे महत्त्व नेमके काय ? लसीकरणापासून रोगांचे संरक्षण कसे होऊ शकते याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिन जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) साजरा केला जातो. या दिवशी लसीकरणाबाबत अनेक ठिकाणी जनजागृती केली जाते. जाणून घेऊयता जागतिक लसीकरण सप्ताहाची यावर्षीची थीम नेमकी काय आहे.
जागतिक लसीकरण सप्ताहाची थीम (World Immunization Week Theme 2022) :
यावर्षी, WHO द्वारे 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जाणार आहे. यावर्षीची थीम “सर्वांसाठी दीर्घायुष्य” (Long Life for All) अशी आहे. लसींच्या माध्यमातून आजारावर कशी मात करता येऊ शकते. आणि निरोगी कसे जगता येऊ शकते. हे या थीमचं उद्दिष्ट आहे.
जागतिक लसीकरण सप्ताहाचे महत्त्व (World Immunization Week Importance 2022) :
कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यावेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी असे औषध लसच मानली गेली होती. आज जवळपास देशातील सर्वच नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संख्या कमी होत चालल्या आहेत याचं कारण लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या दिनाची सुरुवात नेमकी कधी झाली ?
मे 2012 मध्ये, WHO ची निर्णय घेणारी संस्था, जागतिक आरोग्य असेंब्लीने जागतिक लसीकरण सप्ताहाला मान्यता दिली. 2012 पूर्वी, लसीकरण सप्ताह उपक्रम जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात असे. जगातील पहिला "जागतिक लसीकरण सप्ताह" 2012 मध्ये साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जगभरातील 180 हून अधिक देश आणि प्रदेशांचा एकाचवेळी सहभाग होता.
महत्वाच्या बातम्या :