Corona Vaccine : कोरोनावरील लसीबाबत मोठी बातमी आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या किंमतीत कमी करण्यात आली आहे. देशात लसीकरण सुरू झाल्यामुळे करोनाविरोधातल्या लढ्याला मोठं बळ मिळालं आहे. उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. 


सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित  करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता  225 रुपयांना मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 






 


सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड' ची किंमत ही खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.18 वर्षावरील सर्वांनी प्रिकॉशन डोस घेण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पाठोपाठ भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी  देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस दे्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.