World Earth Day 2023 : भारतात दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन (World Earth Day 2023) साजरा केला जातो. वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' म्हणूनही ओळखला जातो. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदराी आहे आणि याचीच आठवण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.


झाडे लावणे, रस्त्यालगतचा कचरा उचलणे, लोकांना शाश्वत जीवन जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आजच्या दिवशी आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. याशिवाय शाळा आणि विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व (World Earth Day Importance 2023)


1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. जैवविविधतेचे नुकसान, वाढते प्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अर्थ डे ऑर्गनायझेशन (पूर्वीचे अर्थ डे नेटवर्क) तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात 193 देशांतील 1 अब्जाहून अधिक लोकांचा समावेश आहे.


जागतिक वसुंधरा दिनाची थीम (World Earth Day Theme 2023)


यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट' "Invest in Our Planet."अशी आहे. म्हणजे 'आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा'. या थीमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे असे आहे. याआधी 2022 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा'.


जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास (World Earth Day History 2023)


जागतिक वसुंधरा दिवस जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो. 60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत, विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी तो साजरा करण्याची घोषणा केली. या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेतला. आणि या परिषदेत 20 हजारांहून अधिक लोक जमले होते. हा दिवस 1970 पासून सातत्याने साजरा केला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी