World Coconut Day 2022 : जागतिक नारळ दिवस दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. नारळ ही केवळ खाद्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर औद्योगिक दृष्टिकोनातूनही निसर्गाची सर्वात अनोखी देणगी आहे. नारळाचा वापर स्वयंपाक, खाण्यापिण्यापासून ते सौंदर्य प्रसाधने आणि सजावटीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. नारळ दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळाविषयी जनजागृती करणे हा आहे. अनेक वर्षांपासून, नारळाचे फायदे आणि त्याचा व्यापक वापर यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जात आहे. 


जागतिक नारळ दिनाचा इतिहास (World Coconut Day History 2022) :


जागतिक नारळ दिन 2009 पासून साजरा केला जात आहे. आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रातील सर्व नारळ उत्पादक देश आंतरराष्ट्रीय नारळ समुदाय (ICC) ची स्थापना करून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा करतात. सध्या 18 देश या संघटनेचे सदस्य आहेत, जे आंतर-सरकारी संस्था म्हणून काम करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. आशिया पॅसिफिकमधील नारळ समुदायाचे मुख्य कार्यालय जकार्ता, इंडोनेशिया येथे स्थापन करण्यात आले आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे.


जागतिक नारळ दिन थीम (World Coconut Day Theme 2022) :


जागतिक नारळ दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. जागतिक नारळ दिन 2021 ची थीम "एक सुरक्षित समावेशक लवचिक आणि शाश्वत नारळ समुदाय तयार करणे" होती. यावर्षी जागतिक नारळ दिनाची थीम 'आनंदी भविष्य आणि जीवनासाठी नारळाची लागवड करा' अशी आहे.


महत्वाच्या बातम्या :